घुग्गुस – कामगारांना काम व वेतन वेळेवर मिळत नसल्याने घुग्गुस येथील लोयड्स मेटल कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कामगार संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी वेतनाची गोष्ट निघते नेमकं तेव्हाच कोरोना, लॉकडाऊन आहे असा समज आम्हाला दिल्या जातो, परिस्थिती काय आहे ते आम्ही सर्व कामगार समजतो परंतु कंपनीच उत्पादन सुरळीत सुरू असताना वेतन व्यवस्थित न देणे हा तर कामगारांवर अन्याय आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या 26 दिवस प्रत्येक कामगाराच्या हाताला कंपनीने काम द्यावे, लॉकडाऊन काळातील उर्वरित वेतन त्वरित देण्यात यावे, कामगारांचा पगारवाढ करारनामा करण्यात यावा, कामगारांचे ग्रेडेशन करण्यात यावे, 58 वर्षे झालेल्या कामगारांना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले त्यांना पूर्वरत कामावर घ्यावे, आजपर्यंत ज्या कामगारांचा कंपनीत काम करतेवेळी मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना कंपनीत सामावून घ्यावे, लॉकडाऊन काळात सुपरवायझर चे संपूर्ण वेतन देण्यात यावे अश्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मागणीवर दखल न झाल्यास कामगार काम सुरू करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
विविध मागण्यांसाठी लोयड्स मेटल कंपनी कामगारांचे कामबंद आंदोलन
Advertisements