कोरोना योद्धांच्या अतुलनीय कार्याचा भाजपतर्फे गौरव

0
99
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” विषाणूने अख्ख्या जगाला वेठीस धरले असून या संकटसमयी आशा वर्कर,सफाई कामगार,डॉक्टर,पत्रकार हे रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.यांच्या कार्याची दखल घेऊन रक्षाबंधनाचे औचित्य साधून तत्कालीन अर्थ नियोजन,वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजप महिला मोर्चाच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली कोरपना येथे तेथील कोरोना योद्धांना राखी बांधून तसेच गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर सह रमेश मालेकर,नगरसेवक अमोल आसेकर,भारत चन्ने,अल्काताई रणदिवे,शोभा आगलावे,इंदिरा कोल्हे, आशा वर्कर,सफाई कामगार तसेच पत्रकारांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here