चंद्रपुर – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम मोडणाऱ्या २३९७ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार तसेच नागरीकांकडून ४,८६,७९०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याऱ्या व अवैध खर्रा विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.
सध्या काही दिवसांकरीता प्रशासनातर्फे लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरीकांची उत्स्फुर्त सहकार्य लाभत असल्याने लॉकडाऊन करण्याचे प्रयोजन यशस्वी होण्यास मदत मिळत आहे. मात्र याही कालावधीत काही मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे, सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे तसेच अवैध खर्रा विक्री करणारे आढळुन आल्यास महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मनपाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र, काही नागरिक सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अश्या १९४ लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे.
याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला २ मास्कसुद्धा देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .
सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे , सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे द्वारे कारवाई करण्यात सातत्याने सुरु आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
1) मास्क न वापरणे –
2101/419140/-
2)सार्वजनिक जागेवर थुंकणे –
194/22500/-
3) विना परवानगी दुकान सुरू दंड/
अवैध खर्रा विक्री
6/24000/-
4) इतर दंड
96/21150/-
================
486790/-