शहराला पाणी पुरविणाऱ्या टाक्यांवर कलाकृतीचे झरे, चंद्रपूर मनपा पाणीपुरवठा विभागाची नयनरम्य कल्पना

0
166
Advertisements

चंद्रपूर  –  अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत चंद्रपूर शहरात बांधण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाक्या आता सौंदर्याचे प्रतिक झाल्या आहेत. शहराला पाणी पुरविणाऱ्या या टाक्यांना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पारंपारिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवुन चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतीक महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची पुढील ५० वर्षांची पाणीपुरवठा मागणी लक्षात घेऊन  केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून अमृत अभियानाअंतर्गत स्वयंचलित पाणीपुरवठा योजना शहरात उभारण्यात येत आहे. संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईनचे जाळे उभारण्यात येत असून विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पारंपारिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवुन मनपाने चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतीक महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे
केंद्र सरकारच्या ‘ स्वच्छ भारत मिशन ‘ २०२१ अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सातत्याने काम सुरु आहे. या स्वच्छता स्पर्धेत अनेक शहरांना मागे टाकत चंद्रपूर शहराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचे महत्व जपण्याच्या दृष्टीने तसेच नव्या पिढीला आपल्या शहराच्या भौगोलिक आणि सांस्कृतीक महत्वाची ओळख असावी या दृष्टीने शहराचा चेहरा – मोहरा बदलविण्याची काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे.
इमारत बांधताना चांगले साहित्य, बांधकाम, मार्गदर्शन, देखरेख मिळाल्यास उच्च प्रतीची गुणवत्ता मिळते, या गुणवत्तेबरोबरच योग्य रंगाची, चित्रांची साथ मिळाल्यास ती इमारत नयनरम्य होते. हीच बाब प्रकर्षाने लक्षात घेऊन मनपातर्फे या नवीन टाक्या पारंपारीक पद्धतीने न रंगवीता  ‘ हटके ‘ रंगविण्यात आल्या आहेत. अतिशय सुंदररीत्या रंगविले जात असल्याने दूरवरूनही या टाक्या अगदी ठळक उठून दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here