गडचांदूरकरांचे आरोग्य धोक्यात, लक्ष्मी टॉकीज परिसरात डेंग्यूचा उद्रेक

0
61
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 8 लक्ष्मी टॉकीज परिसरात डेंग्यूचा उद्रेक वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.या क्षेत्रात आतापर्यंत 5 डेंग्यूचे रूग्ण आढळल्याची माहिती असून यावर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करून डेंग्यू आजाराची साथ उद्रेक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नगरपरिषदेला पत्राद्वारे सांगितल्याचे कळते.काही दिवसापुर्वी याच क्षेत्रात कोरोना रूग्ण आढळून आल्याने परिसर कंटेंन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. याकाळात नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज होती.मात्र परिसर खुला झाल्यानंतर ही येथील अस्वच्छता कायम होती.नाल्या तुडुंब भरल्या होत्या,जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पाहून नागरिकांनी निवेदनाद्वारे सफाई करण्याची मागणी केली मात्र नगरपरिषदेने केराची टोपली दाखवल्याचे आरोप होत आहे. नगरपरिषदेची वाट न पाहता अखेर नागरिकांनी स्वतः आपापल्या घरासमोरील नाल्या साफ केल्याचे पहायला मिळाले.एकीकडे शहरात स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर असताना दुसरीकडे मात्र स्वच्छतेच्या नावाखाली शासनाला लाखोंचा चुना लावला जात असल्याच्या आरोपांना उधाण आले आहे.नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभार,निष्काळजीपणा बद्दल नागरिकांनी खालपासून तर वरपर्यंत अनेक तक्रारी केल्या मात्र कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा होताना दिसत नाही.यामुळे अधिकाऱ्यांची अरेरावी कायम असून पदभार स्वीकारलेले जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन गडचांदूर नगरपरिषदेत सूरू असलेल्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी वजा विनंती नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here