शिपाई संतोष राठोड यांना १ वर्ष १० महिन्यापासून वेतन नाही, वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आमरण उपोषणाला

0
107
Advertisements

जिवती :-चंद्रपुर जिल्ह्यातील नेहमीच वादाच्या भोवर्यायत असलेली सौ. लालिबाई माध्य. आश्रमशाळा जिवती येथील शिपाई संतोष मोहनलाल राठोड यांना मागील १ वर्ष १० महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे त्याने मुख्याध्यापक, संस्थाचालक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपुर यांच्या विरोधात वेतन मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर, समोर आमरण उपोषणास बसण्याबाबत निवेदन दिले.
शिपाई संतोष राठोड याला संस्थाचालकने ०७/०१/२०१८ ला निलंबनाचे पत्र दिले. विशेष म्हणजे निलंबन करण्यापूर्वी नियमानुसार सक्षम अधिकार्याेची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसे न करता अनेक खोटे व बनावटी आरोप लावून निलंबन करण्यात आले. निलंबनानंतर ४५ दिवसात विभागीय समितीद्वारे प्रकरणाची चौकशी करणे नियामधीन आहे मात्र त्यालाही फाटा देण्यात आला. निलंबनाधीन कालावधीमध्ये कर्मचार्यारस उपजीविकेसाठी निर्वाह भत्ता देणे गरजेचे आहे मात्र तो सुद्धा न देता तब्बल १ वर्ष १० महिन्याचे वेतन गोठवून संस्थाचालक, मुख्याध्यापक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपुर यांनी संगनमताने त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक पिळवणूक केलेली आहे असा आरोप त्यांनी उपोषनाबाबत दिलेल्या पत्रात केलेला आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी राठोड यांनी प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त, चंद्रपुर यांच्याकडे वारंवार निवेदने दिलेली आहे मात्र त्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. वेतन मिळत नसले तरी ते दररोज शाळेत जाऊन आपले कर्तव्य नियमित बजावत आहेत, वेतन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. बँक कर्ज हफ्ते, विम्याचे हफ्ते, मुलांची शिक्षण फी व इतर आर्थिक व्यवहार प्रलंबित असून इतरही अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घर चालवण्यासाठी त्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून परतावा कर्जाची मागणी केली मात्र संस्थाचालकाने त्यांचा कोणताही अर्ज स्वीकारायचा नाही असे आदेश मुख्याध्यापकांना देऊन त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
न्याय मागण्याकरिता शेवटचा इलाज म्हणून त्यांनी विधायक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर, समोर दिनांक १५ ऑगष्ट २०२० पासून आमरण उपोषण सुरू करण्याबाबत निर्णय घेतला असून तसे निवेदन मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर, यांना दिलेले आहे.

शाळेचे शिपाई संतोष राठोड हे काही महिने गैरहजर होते त्या कालावधीचा पगार काढलेला नाही परंतु त्याचा जुलै 2019 ते जून 2020 या एक वर्षाचा पगार 75 टक्के प्रमाणे टाकला आहे
-सुरेश निमगडे,मुख्याध्यापक लालीबाई आश्रम शाळा,जिवती

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here