घुग्गुस – वर्धा नदी जवळील बेलोरा घाट येथील हिंदू व अन्य धर्मांच्या समाधी व स्मशान घाट आहे आज त्या सर्व समाधी जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्या ही माहिती मिळताच घुग्गुस कांग्रेसचे शहर अध्यक्ष रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी केली.
ठेकेदारांच्या या कृत्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या ज्यामुळे समाज बांधवात चांगलाच रोष निर्माण झाला आहे.
सोलर पॅनल लावण्यासाठी, अंत्यसंस्कार स्थळी येणाऱ्या नागरिकांना पाऊस व उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेड परिसरातील परिसर जेसीबीच्या साहाय्याने लेव्हल करण्यात आला.
त्या परिसरात सोलर पॅनल लावण्यासाठी त्या समाधी सुद्धा पाडण्यात आल्या, या प्रकरणाची घुग्गुस पोलीस स्टेशनला नागरिक व रेड्डी यांनी तक्रार करून त्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी सैय्यद अनवर, दीपक मिसाला, रुतीन सपडी, सिनू मिसाल, वसंत कलवल, मुकेश पांडे यांची उपस्थिती होती.