व्हिडिओ कॉन्फरन्स नको,सभागृहात सभा घ्या, विरोधी पक्ष नगरसेवकांची मागणी

0
89
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगात “कोरोना” ने आपले जाळे विणले असून या विषाणूने देशवासीयांना अक्षरशः हादरून सोडले आहे.सरकार यावर उपाय म्हणून नानाप्रकारे प्रयत्न करत असल्याचे चित्र पहायला मिळत असून मास्क,सोशल डिस्टंसिंग,सॅनिटायजर वापरावर अधिक भर दिला जात आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विवाह सोहळ्यात केवळ 50 लोकांची उपस्थिती गणपती,पोळा,ईद अशा व इतर सार्वजनिकरीत्या होणार्‍या धार्मिक सण,उत्सवांवर बंदी घालत सण घरीच साजरे करण्याची विनंती करण्यात आली आहे.नानाप्रकारच्या अटी,शर्ती लादल्या गेल्या परंतु गडचांदूर नगरपरिषद यासाठी अपवाद ठरल्याचे आरोप होत असून कोरोना काळात शासनाने लावलेले सर्व नियमांना धाब्यावर बसवून याठिकाणी मोठ्याप्रमाणात अधिकारी,कर्मचाऱ्यांचे वाढदिवस,वर्धापन दिन साजरे झाले,40,50 च्या संखेत जमा होऊन व्यापारी असोसिएशनची मिटींग झाली.कोरोना योद्धा म्हणून कर्मचारी,अधिकाऱ्यांचा सत्कार झाला,तेव्हा शासन नियमांची जाणीव नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.इतर ठिकाणांच्या न.प.मध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सभा घेण्यात आल्याचे कळते मग गडचांदूर नगरपरिषदेत व्हिडिओ काँफ्रंसींगद्वारे सभा घेण्याचा हट्ट का ? असा प्रश्न उपस्थित करत समोरासमोर मुद्देसुद मांडणी व उपाययोजनेसाठी सभागृहात सभा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.शिवसेना नगरसेवक तथा गटनेता सागर ठाकूरवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना याविषयी निवेदन सुद्धा दिला आहे.
———————————————–
यासंदर्भात News34 प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून नगरपरिषद उपाध्यक्ष, गटनेता,आरोग्य सभापती व काही सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष नगरसेवकांचे मत जाणून घेतला असता त्यांनी अशाप्रकारे मत व्यक्त केले.
गडचांदूर न.प.ची निवडणूक पार पडून सात महिन्याचा कालावधी लोटला.तेव्हापासून केवळ एकच सभा झाली.कोरोनाच्या धर्तीवर शासनाच्या आदेशाप्रमाणे सभागृहात मिटींग घेता येत नाही असे मुख्याधिकारी सांगतात.मला असे म्हणायचे आहे की,नगरपरिषदेत इतर कार्यक्रम घेता येते.त्याला शासनाचे नियम लागू नाही का ? परंतु सोशल डिस्टंसिंग व इतर नियम पाळून शहराच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यांनी नियमांवर बोट ठेवले आहे.सभा बोलावण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.सध्याची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टंसिंग,मास्क व सॅनिटायजरचे वापर करत सभागृहात सभा घ्याला पाहिजे परंतु यांना आपल्याच अधिकाराची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेत मोठा हॉल उपलब्ध असून शासनाचे नियम पाळून सभागृहात सभा घ्या व्हिडिओ काँफ्रंसींग मिटींग नको असे माझे मत आहे.
(विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे)
————————————————-
काही मुद्दे असे आहे जे सभागृहात मांडल्या शिवाय सुटणार नाही. आपल्याकडे मोठा सभागृह उपलब्ध आहे. आणि 19 नगरसेवक आहे.इतर 2,4, धरले तरी शासनाचे नियम पाळून आरामशीरपणे याठिकाणी सभा घेता येते.त्यामुळे सभागृहातच मिटींग घ्यायला पाहिजे असे माझे मत आहे.
(विरोधी पक्ष शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक धनंजय छाजेड)
————————————————
मला तर असा वाटते अॉफलाईनच घेतलेला बरं राहील.अॉनलाईन मध्ये प्रत्येकाची प्रतिक्रिया आपल्याला माहिती पडणार नाही.आणि कसा आहे, समोरासमोर बोलना होईल.माझ्या मते अॉफलाईन सभा ठिक होती पण CO मॅडम म्हणत आहे की,यासाठी कलेक्टर साहेबांचे अॉर्डर नाही,आपल्याला अॉनलाईनच(व्हिडीओ काँफ्रंसींग) सभा घ्यावी लागेल.आता तारीख पण ठरली आहे आणि शासनाचे अॉर्डर सुद्धा आहे.पहिलेच कोरोनामुळे सभा झालेली नाही आता होत आहे तर होऊ द्या.शासनाच्या आदेशा विरूद्ध आम्ही जाणार नाही.
(आरोग्य सभापती,सौ.जयश्री ताकसांडे)
————————————————
सोशल डिस्टंसिंग व इतर नियमांचे पालन करून सभागृहात सभा घेता येते कारण प्रत्येक नगरसेवकांना काँफ्रंस समजत नाही.आणि कित्येकांकडे अँड्रॉइड मोबाईल पण नाही.याकरीता कोरोनाचे संकट लक्षात घेता नियमांचे पालन करून सभागृहात सभा घ्यावी असे माझे मत आहे.कालच मी यासंदर्भात नगरपरिषदेला निवेदन सुद्धा दिले आहे.
(विरोधी पक्ष शिवसेना नगरसेवक तथा गटनेता सागर ठाकूरवार)
——————————————–
जे शासनाचे निर्देश आहे त्याचे आम्ही पालन करू.परंतु अॉफलाईन मिटींग झाली असती तर बरं झाला असता.यानंतर शासनाने अॉनलाईन मिटींगचे आदेश काढावे असे माझे मत आहे.
(काँग्रेसचे नगरसेवक,गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे)
————————————————
सभेच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे पत्र आले आहे.त्यानुसार मिटींग घेऊ.आगामी काळात त्यांनी जर म्हटले तर सभागृहात ही सभा घेऊ अशी सावध प्रतिक्रिया उपाध्यक्षांनी दिली.
(शरद जोगी उपाध्यक्ष न.प.गडचांदूर)
——————————————-
अॉनलाईन मिटींगची गरज नाही असा मला वाटते,कारण की नगरसेवकांची संख्या काही जास्त नाही आहे.त्यामुळे सामाजीक अंतर राखून सॅनिटायजरचे वापर करून मिटींग घेऊ शकते.गडचांदूरच्या विकासासाठी महिन्यातून एक मिटींग राहते.अॉनलाईन मध्ये मुद्दे बरोबर मांडता येत नाही म्हणून अॉफलाईनच मिटींग झाली तर बरे होईल.
(विरोधी पक्ष भाजपचे स्वीकृत नगरसेवक सतीष उपलेंचीवार)
——————//———————–
यासंदर्भात इतरांचे ही मत जाणून घेण्याचा प्रयत्न झाला पण संपर्क झाला नाही.एकुणच सत्ताधाऱ्यांची भूमिका व्हिडिओ काँफ्रंसींग सभेसाठी सकारात्मक तर विरोधी पक्ष नगरसेवकांची नकारात्मक दिसत आहे.आता मिटींग अॉनलाईन होते की अॉफलाईन हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here