कोरपना शासकिय कापूस खरेदी केंद्र चालू करा, तहसीलदारांना निवेदन

0
74
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
भारतीय कपास निगम अंतर्गत राज्यांमध्ये शासकिय हमीभाव केंद्राद्वारे कपाशीची कोरपना येथे 2019,20 वर्षात शासकीय कापूस खरेदी केंद्र कोरपना येथे देण्यात आले होते.त्यानुसार खरेदी सुद्धा झाली परंतु 2020,21या वर्षातील कापूस पिकांचा शासकिय खरेदी केंद्रातून कोरपना केंद्राचे नाव वगळण्यात आला असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
कोरपना,जिवती हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्र असून दोन्ही तालुक्यातील कापसू पिकांची लागवड अंदाजे 40 हजार हेक्टरच्या जवळपास असून दोन्ही तालुक्यातील मुख्य पिक कापसू आणि मुख्य व्यवसाय शेती आहे.याभागात शासकिय कापूस खरेदी केंद्रांची अति आवश्यकता असताना शासनाने कोरपना केंद्रांचे नाव वगळणे हे न उलगडणारे कोडे बनले आहे.केंद्राकडे पाठपुरावा करून कोरपना येथील शासकिय कापूस खरेद केंद्र चालू करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे,उप जिल्हाप्रमुख धनंजय छाजेड,युवासेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उप जिल्हाप्रमुख प्रणित अहिरकर यांनी कोरपना तहसीलदाराकडे निवेदनातून केली आहे.यावेळी अहिरकर सह तालुका प्रमुख अंकुश वांढरे,राज्जत ठाकूरवार,आसीफ किडीया,अतूल आसेकर,यश ठाकूरवार,नितीन धांडे,मोहन बोढाले,करण दुबे मंगेश उरकुडे,सुरज भोयर,धनराज चौधरी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here