चंद्रपूर – सध्या कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, अस्वच्छता राहिल्यास डासांची पैदास वाढुन डेंग्यू तसेच मलेरिया या विषाणूजन्य आजारांचीही त्याला सोबत होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणांत ताण येण्याची शक्यता आहे. याकरीता महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त श्री राजेश मोहिते यांचे मार्गदर्शनात सर्व सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात शहरातील सर्व भागात स्वच्छता, घरोघरी पाणीसाठ्याची तपासणी, प्रत्येक भागात फवारणी, धूरळणी नियमित व सातत्याने करण्यात येत आहे.
डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ पाण्यात अंडी देणारा असल्याने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार झोन क्र. २ अंतर्गत 15 कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंगू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही कामगार फवारणी, काही धुरळणी तर इतर कामगारांद्वारे नागरीकांच्या घरी पाण्याने भरलेले कुलर, पाण्याचे टाके, ड्रम रिकामे करून त्यात आबेट नावाचे औषध सोडत आहे त्यामुळे डासांची अंडी नष्ट होण्यास मदत मिळत आहे.
सोसायट्यांतील रहिवाशांनी जमिनीखालील व जनिमीवरील टाक्या स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, परिसरात कचरा साचू देऊन नये. घरी असलेल्या फ्रिजची टॅंक हमखास साफ करावी. तसेच डास अळी आढळणारी भांडी नागरिकांनी रिकामी करावी. एकदा भरलेले कुठलेही पाणी सात दिवसापर्यंत साठवून ठेवण्यात येऊ नये. पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या गोष्टींचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. पिण्याचा पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरीकांनी आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याची भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळून स्वतःचे व कुटूंबाचे आरोग्य रक्षण करू शकता, तेव्हा सतर्क राहुन स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
कोरडा दिवस पाळण्याचे मनपाचे आवाहन
Advertisements