लॉकडॉउनच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारात पोचले शिक्षण: शासकिय आश्रमशाळेतील शिक्षकांचा नवा प्रयोग

0
85
Advertisements

जीवती/पाटण –  08/08/2020 अनलॉक लर्निंगच्या पार्श्वभुमिवर आश्रमशाळेतील शिक्षक वर्ग शाळेतील प्रवेशित विद्यर्थ्यांच्या गावात जाउन शिक्षण देत असल्याचे समजते. शासकिय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील मुख्याध्यापक श्री.वासुदेव राजपुरोहीत यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत विचारले असता, “सध्या आमच्या शाळेतील सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना भेट देत असुन शिक्षणासंबंधी प्रत्यक्ष व साधन व्यक्तीद्वारे मार्गदर्शन करीत आहेत….” असे मत व्यक्त केले.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या गावात, खेडोपाडी, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. नागरी जिवनापासुन दुर वसलेल्या या सामाज बांधवांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटीबद्ध असुन निरंतर सेवारत आहे. त्यातही आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शासकिय व अनुदानीत आश्रमशाळेच्या माध्यमातुन करीत आहे.
आज कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव व संसर्गजन्य रोगाच्या विषानुमुळे होणारी जिवीत हाणी या पासुन सर्वांचे संरक्षण व्हावे स्वत: शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करुन इतरांचे देखील रक्षण व्हावे. यासाठी कुठल्याही आश्रमशाळेतील शिक्षक कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आदिवासी विद्यर्थ्यांच्या गावात जाउन, मास्क लावुन, दोघांमध्ये दो गज दुरी या उक्तीचे पालन करीत अंतर ठेउन, सॉनिटायझरचा वापर करुन विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करीत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अनलाॕक लर्निंग उपक्रमान्वये मा. प्रकल्प अधीकारी श्री.निलय राठोड साहेब व सहा.प्रकल्पअधिकारी (शिक्षण ) श्री. धोटकर, श्री.खडसे यांच्या मार्गदर्शनात अनलॉक लर्नींगच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या नव्या प्रयोगाची अंबलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी पालकाची खालावलेली आर्थीक परीस्थीती अत्यंत गरीबी व मागासलेपणाची आहे. त्यांना मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी जिवाचा आटा-पीटा करावा लागत आहे. अशा परीस्थीतीत आपल्या मुला-मुलींना दहा-बारा हजाराचा मोबाईल घेउन देणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे आदिवासींचे निवासस्थान जंगलात, दुर्गम भागात, डोंगर कपारीत असल्याने मोबाईलची रेंज त्या ठीकाणी असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे आदिवासी पालकांची गरीबी, मोबाईल कवरेजचा प्रश्न, रीचार्ज साठी लागणारा पैसा, मोबाईल हाताळण्या विषयीचे अज्ञान अशा समस्यांमुळे “ऑनलाईन लर्निंग” द्वारे शिक्षण सेवा उपलब्ध करुन देणे शक्य नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने एक नविन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आश्रमशाळेतील शिक्षकांना प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गावानुसार काही गावे दत्तक घेउन त्या गावात मार्गदर्शन करावे असे शासनाने सुचित केले होते. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या दत्तक गावात जाउन तेथील विद्यार्थ्यांना वाचन लेखनावर भर देणे, मुलभुत संकल्पना स्पस्ट करण्यासाठी कोरोणा विषानुच्या कालावधीत लॉकडाउनच्या सिमा रेषेत विद्यार्थ्यांचा संबंध पुस्तकांशी असावा या उद्देशने गावातील होतकरु व शिकलेल्या सुज्ञ नागरीकाची साधन व्यक्ती म्हणुन निवड केली. या कामात प्रत्येक गावात एक पालक शिक्षक समिती गठीत करण्यात आली असुन ती आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत जागृत असल्याचे दिसुन येत आहे.
शासकिय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथे परिसरातील जिवती , कोरपना व राजुरा या तालुक्यातील 37 गावांमधील एकंदर 247 विद्यार्थी शिक्षण घेत असुन त्यात 145 मुले व 102 मुली शाळेत दाखल आहेत. पाटण, खडकी, टिटवी, पोचुगुडा, कोलामगुडा, घाटराईगुडा, अंबेझरी,सितागुडा, जनकापुर या गावांत शिक्षणाचे कार्य प्रत्यक्षपणे व साधन व्यक्तीच्या मार्फतीने सुरु आहे. अशा अभ्यास क्रमाचे वर्ग जिल्हा परीषद शाळेच्या प्रांगनात, वऱ्हांड्यात, झाडाखाली, समाज मंदीरात व इतर ठिकाणी साधन व्यक्ती अध्यापनाचे कार्य करीत आहे. शिक्षक दोन दिवसातुन एकदा प्रत्येक गावाला भेट देउन साधन व्यक्ती, विद्यार्थी व पालक वर्गाच्या अभ्यासासंबंधीच्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हल्ली शेतीच्या कामाला अधीक जोर आला असुन घरातील लहान-सहान मुलांना देखील शेतावर काम करण्यास जावे लागते. अशा वेळेस नेमुन दिलेली साधन व्यक्ती स्वत:च्या व विद्यार्थ्यांच्या सवडीनुसार शिक्षणाचे, मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. सायंकाळी शेतातुन परत आलेला आदिवास समाज बांधव जेव्हा आपल्या पाल्यांना शिकत असतांना व शिकवीत असतांना पाहतो तेव्हा मन भरुन पावल्याचे समाधान घाटराईगुड्याच्या पोलीस पाटलांनी व्यक्त केले आहे. पालक समिती या कामात सहकार्य करीत आहे. आपल्याच भाषेत कोणीतरी आपलाच बहीन-भाऊ हसत खेळत शिकवीत असल्याचा एक वेगळाच अनुभव विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या नव्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायची आवड निर्माण झाली असुन पालक वर्ग देखील समाधानी असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here