कोरपना येथील “सीसीआय केंद्र” चालू करा, भाजपची मागणी, पूर्व केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांना निवेदन

0
59
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुका हा कापूस पिकांसाठी प्रसिद्ध असून या क्षेत्रातील शेतकरी मोठ्याप्रमाणात कापसाचे पिक घेतात.मात्र आता हे पांढरे सोने विकायचे तरी कुठे असे संकट उभे झाले आहे.याला कारण ही तसेच आहे.काही अडचण नसताना अचानकपणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आदेशाप्रमाणे “सीसीआय केंद्र” बंद केल्याची माहिती आहे.सध्या सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी सुद्धा कोरोना महामारीला सामोरे जात असताना घेण्यात आलेला हा निर्णय उचित नसून जर केंद्र बंद झाले तर कोरपना तालुक्यातील शेतकरी कापूस विकणार कुठे ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.शेवटी नाईलाजास्तव खाजगी व्यापाराला कवडीमोल भावाने कापूस विकावा लागेल.यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून 2020, 21 या वर्षासाठी येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी कोरपना तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात विशाल गज्जलवार,कवडू जरीले,पुरूषोत्तम भोंगळे,किशोर बावणे,सरपंच अरूण मडावी,रमेश मालेकर,अमोल आसेकर,भारत चन्ने,विलास पारखी, उत्तरवार,पद्माकर दगडी इत्यादींनी पूर्व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here