राष्ट्रवादी कांग्रेसच्या शहरअध्यक्षाला खंडणी प्रकरण भोवणार? माजी नगरसेवकाला शहर अध्यक्ष पदाचा लॉलीपॉप, राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये दुफळी?

0
84
Advertisements

चंद्रपूर – मागील महिन्यात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांचे विरोधात खंडणीवसुलीची तक्रार केली, अधिकाऱ्यांच्या या तक्रारीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती.

यावर खुलासा देत कक्कड यांनी मी परिवहन विभागात कधी गेले नसल्याची बतावणी केली, परंतु आता हे प्रकरण त्यांच्या अंगावर येणार अशी फिल्डिंग सुद्धा जिल्हाध्यक्ष यांनी लावली आहे.

Advertisements

9 ऑगस्टला राष्ट्रवादी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, जेष्ठ पदाधिकारी यांनी बैठक घेत शहर अध्यक्ष पदासाठी दुसरा पर्याय बघण्याचे सुचविले, या पदासाठी कांग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते कातकर यांचं नाव सुचविल्या गेले, नाव सुचविल्यावर कातकर यांनी जवळचे कार्यकर्ते गोळा करीत जिल्हाध्यक्ष समोर शक्ती प्रदर्शन सुद्धा केले.

जिल्हाध्यक्ष तुलाच शहर अध्यक्ष बनवू असा लॉलीपॉप दिला, परंतु त्यांच्या या लॉलीपॉप ने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र जाम नाराज झाले, आम्ही इतके वर्षे पक्षाला वेळ दिला आणि जेव्हा पद देण्याची वेळ आली तर बाहेरून कार्यकर्ते आयात करावे लागत आहे, आमच्या नावाचा विचार कधी होणार असा सूर काहींनी त्या बैठकीत लगावला, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीबद्दल राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा काही माहिती नाही, पक्ष सत्तेत आल्यावर पक्ष संघटन कसे वाढवावे याबद्दल पक्षश्रेष्ठी विचार करीत असते परंतु चंद्रपूर जिल्ह्यात याबाबत सर्व उलट आहे. कक्कड यांच्यावर करण्यात आलेली तक्रार अजूनही तक्रारच आहे, जिल्हाध्यक्षांच्या या कार्यप्रणालीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते वैतागले आहे, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसचे 2 गुट तयार झाले तर संबंधितांनी आश्चर्य व्यक्त करू नये.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here