Breaking News

चंद्रपूर@856 कोरोनाने पुन्हा 1 मृत्यू, एकूण 4 बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात आज 23 बाधितांची भर

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे.

Advertisements

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलाचा समावेश आहे. याशिवाय पोलीस लाईन बिल्डिंग तुकुम येथीलच एक 22 वर्षीय युवक कोरोना सदृष्य आजाराचे लक्षण असल्याने तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे.
दत्तनगर नागपूर रोड सिव्हिल लाईन येथील 21 व 22 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुर्गापुर वार्ड नंबर 2 येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथील 31 व 30 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहे. हिंदुस्तान कॉलनी लालपेठ वॉर्ड येथील 30 पुरुष व 44 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.पोलीस लाईन येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. जटपुरा गेट येथील 38 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. रामनगर शुभमंगल कार्यालयाजवळील 27 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. पोलीस लाईन तुकूम येथील 55 वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प येथील 21 वर्षीय व 58 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरले आहे. याशिवाय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेली 30 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
याशिवाय जिल्ह्यातील वाडेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, घुग्घुस चंद्रपुर येथील 56 वर्षे पुरुष आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील भांडेगाव येथील 25 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. असे आजचे एकूण 23 पॉझिटिव्ह पकडून 856 बाधित आतापर्यंत पुढे आले आहे.
जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना लागन झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण सहा आहे. यामध्ये चार रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य दोन चंद्रपूर येथे वैद्यकीय उपचार घेताना मृत्युमुखी पडले. अन्य ठिकाणच्या 2 मृत्यू मध्ये तेलंगाना व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. एक महिला तेलंगणा येथील होती. तर दुसरा 60 वर्षीय कामगार हा बुलडाणा येथील होता. बल्लारपूर येथे काझीपेठ एक्सप्रेसने आला होता. त्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नाही.
जिल्ह्यात आज 9 ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री दीड वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी दुर्गापूर येथील 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी जयराज नगर येथील 72 वर्षीय महिला नागपूर येथे उपचारा दरम्यान 2 ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडली होती. तर एक ऑगस्ट रोजी रहमत नगर येथील 42 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला होता. याप्रमाणे जिल्ह्यातील रहिवासी असणारे आतापर्यंत चार मृत्यू झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
× Send Your News