चंद्रपूर – कन्नड रक्षक गुंडाकडून सिमावासियांवर अन्याय होतl होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही सीमा बांधवांवर अन्याय केले. त्यास कोल्हापुरातील शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आता मात्र कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा स्मारक एका रात्रीत काढला गेला. हा स्मारक पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी कर्नाटक भाजप सरकारला दिला आहे. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो”, “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.
या प्रकाराविरोधात संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले यात प्रमुख उपस्तिती संदीप गिर्हे (जिल्हा प्रमुख शिवसेना) सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख, प्रमोद पाटील (महानगर प्रमुख), संतोष नरुले (तालुका प्रमुख),राहुल विरसुटकर, अर्जुन सिंग धुनां, स्वप्नील काशीकर, सागर ठाकूरवार,अक्षय गोरे, प्रणित अहिरकर, सुरेश नायर,अनुप बेले,विक्रांत सहारे, अक्षय अंबिरवार युवा सेना शहर प्रमुख, हेमराज, बावणे तालुका प्रमुख,तसेच महिला आघाडी चे भारती दुधानी, माया ताई पटले, शिवसेना महिला शहर प्रमुख वर्षा कोठेकर, शोभा ताई वाघमारे, मंटी दीदी,बबली बारई, हर्षा वानोडे, प्रकाश पाठक , वसीम शेख, सोनू ठाकूर,विनय धोबे, सुरज घोगे,सूचित पिंपळशेंडे, विगनोज राजूरकर,सुमित अग्रवाल, सागर तुरक,रोहित नलके,मंथन वसाड,गणेश काळे,प्रतीक नागरकर,ऋषी बनकर,करण वैरागडे, विश्वास इटनकर, सुरज शेंडे, अभिलाषा कुंभारे इत्यादी शिवसेना, महिला आघाडी व युवा सेना पदाधिकारी व आदी शिवसैनिक उपस्तित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कराल तर याद राखा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू :- कर्नाटक भाजप सरकारला शिवसेनेचा इशारा
Advertisements