विरुगिरी आंदोलन 5 वा दिवस, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीवर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी नापास, महाजेनको प्रशासन झाले निष्ठुर

0
185
Advertisements

चंद्रपूर – अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न म्हणजे चंद्रपूर व महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांचा, जमिनी संपादन करून सुद्धा प्रकल्पग्रस्ताना अजूनही सरकारने नोकरीमध्ये सामावून घेतले नाही.

प्रकल्पग्रस्तना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी मागील 5 दिवसापासून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवर चढून एकूण 7 प्रकल्पग्रस्तांनी शासनाविरोधात विरुगिरी आंदोलन छेडले आहे.

Advertisements

विरुगिरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीज केंद्रातील व्यवस्थापनाने अन्न व पाण्यापासून प्रकल्पग्रस्तांना वंचित केले आहे.

आंदोलनाचा 5 वा दिवस असताना पालकमंत्री, खासदार यांनी आंदोलनस्थळी जाणे टाळले, यावरून आंदोलनकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू पण तुम्ही आधी आंदोलन मागे घ्या अशी भूमिका ऊर्जामंत्री राऊत यांनी घेतली होती, परंतु लेखी आश्वासनाशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यामुळे ऊर्जामंत्री राऊत यांनी नागपूरची बैठक काही तोडग्याशीवाय टाळली.

आंदोलक मागील 5 दिवसापासून उपाशी आहे, त्यांना साधं पाणी सुद्धा स्थानिक प्रशासन देत नाही आहे, हक्काच्या लढाईत जीव गेला तरी चालेल पण आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here