कोरोनाच्या धर्तीवर अस्वच्छता देत आहे साथीच्या आजारांना आमंत्रण, फॉगिंग मशीन 4 महिन्यापासून नादुरुस्त, आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, भाजप नगरसेवक डोहे व मोरे यांचा आरोप, निवेदन सादर

0
187
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगावर “कोरोना” चे संकट कायम असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे सुद्धा अंदाजे 25 च्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.त्यातील काही रुग्णांना स्थानिक नगरपरिषद आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा भोवला असे आरोप पुर्वीच शहर भाजपकडून करण्यात आले आहे.अगोदरच कोरोनामुळे लोक कमालीचे भयभीत असून अशावेळी जर डेंग्यू,मलेरिया सारख्या साथींच्या रोगांची लागण होण्याची सुरूवात झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.शहराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असताना मागील काही दिवसांपासून स्थानिक न.प.च्या आरोग्य विभागाने याकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे अनुभवास मिळत आहे.नाली सफाई होत नसल्याने शहरात बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या 4 महिन्यांपासून फॉगिंग मशीन नादुरुस्त(बंद) आहे,शहरातील कचरा योग्य रितीने उचलला जात नाही,स्वच्छता ठेकेदाराचे मुख्य काम बंद करून त्याच्याकडून प्रतिबंधित क्षेत्र परिसर सील करण्याचे काम करवून घेतले जात आहे.कोरोनाचे काम महत्वाचे असले तरी शहराची स्वच्छताही तेवढीच महत्वाची आहे.संपूर्ण शहरात नाली सफाईचा अभाव दिसत असून फॉगिंग मशीन दुरुस्त न केल्याने कीटकनाशक फवारणी बंद आहे.यामुळे जीवघेण्या साथीच्या रोगाला आमंत्रण मिळत आहे.अशाप्रकारे आरोपांच्या फैरी झाडत शहरातील नाली सफाई व कीटकनाशक फवारणीच्या कामांकडे जातीने लक्ष घालावे अशी मागणी वजा विनंती नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे आणि रामसेवक मोरे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारीकडे केली आहे.जिल्हाधिकारी,जिल्हा प्रशासन अधिकारी,नगराध्यक्षा व आरोग्य सभापती न.प.गडचांदूर यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.आता यांना जनतेच्या आरोग्याची किती काळजी आहे हा येणारा काळच ठरवेल हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here