भगवान श्रीराम हे भाजप ची मक्तेदारी नाही :- खा बाळूभाऊ धानोरकर

0
89
Advertisements

चंद्रपूर – दिनांक ८ ऑगस्ट रोजी घाटंजी येथील कार्यक्रमात मा खा साहेबांचे वक्तव्य आज घाटंजी येथील कार्यक्रमात मा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत व मा शिवाजीराव मोघे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली स्वर्गीय सुरेशबाबु लोणकर यांचा घाटंजी येथील सहकार क्षेत्रातील व राजकिय दृष्टया नामवंत असा गट आदरणीय बलु पाटील लोणकर व आशिषभाऊ लोणकर (जि प सदस्य) व अभिषेक भाऊ ठाकरे यांनी काँग्रेस पक्षा विलिन केला त्यावेळी काही नगरसेवक यांनी पक्षामधे प्रवेश केला त्यावेळी मा शिवाजीराव मोघे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी या ठिकाणीं मार्गदर्शन केले त्यात अयोध्येतील राममंदिराच्या भुमिपुजन प्रसंगी अनेक ठिकाणी भाजपचे झंडे दिसले, ते कशासाठी ? भगवान श्रीराम हे सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान असुन भाजपची मक्तेदारी नसल्याचे वक्तव्य मा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले, पुढे ते म्हणाले की काही वर्षापुर्वी भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यक्रमात महात्मा गांधींच्या फोटो नसायचा परंतु मताच्या राजकारणासाठी अलीकडच्या काळात महात्मा गांधींच्या फोटो चा उपयोग हा भारतीय जनता पक्षाने करायला सुरूवात केली आहे हे आपल्या मनोगत व्यक्त करत असताना खासदार साहेबांनी सांगीतले त्यावेळी मा शिवाजीराव मोघे साहेब ,मा बलु पाटील लोणकर, मा शंकरराव ठाकरे-मा अध्यक्ष भुविकास बैक ,मा भारत राठोड ,मा स्वामी बाबु काटपेलीवार, मा जितेंद्र भाऊ मोघे ,मा आशिषभाऊ लोणकर, अभिषेक ठाकरे,डा भुरे साहेब, नामदेव आडे, मा मानिकराव मेश्राम, ईकलाख पटेल, सहदेव राठोड, बळीराम पवार, मारोतराव पवार, रफीक पटेल, परेश कारीया,किशोर दावडा, विजय कडू,सुभाष गोडे,चंदु सोनटक्के ,गणेश मुदलवार,स्वानंद चव्हाण, सुनिल हुड, आकाश आत्राम, सागर डंभारे,बबलु राठोड हे हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुरे साहेब यांनी केले, सुत्रसंचालन गणेश मुदलवार यांनी केले, तर आभार मा सहदेव भाऊ राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here