भद्रावती
अब्बास अजानी
येथील प्रसिद्ध गवराळा गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर दारू गांजा ची सर्रास विक्री करणार्या दारू माफियावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोंडि धर्मिय आदिवासी एकता संघटना भद्रावती च्या वतीने एका निवेदनाद्वारे भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल सिंग पवार यांचा कडे करण्यात आली.
दि.6 ऑगष्ट रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश मंदिराच्या प्रवेश द्वारापुढे दारू व गांजा ची सर्रास विक्री करीत आहे.लोकांच्या पुष्कळ तक्रारी तोंडी स्वरूपात आमच्या संघटने कडे आल्या आहे. या प्रकारावर आळा बसावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी संघठनेची मागणी आहे. प्रवेश व्दारा जवळ अवैध दारू विक्री चालु केली आहे. त्या ठिकाणी त्यांने दारू पिण्यासाठी लागणार्या पाण्यासाठी प्लास्टिक च्या ग्लास ची व्यवस्था केली आहे. त्याच्या या अवैध दारू विक्रीच्या दुकानात गांजा पिनारे आंबट शोकीण लोक येतात. त्यामुळे धार्मिक परिसरातील वातावरण खराब होत असुन परिसरातील सूज्ञ नागरीक व महिला यांना मोठा ञास सहन करावा लागतो.येथुन दारू पिऊन येणार्या लोकांचे परिसरात भांडणे होतात. ते एकमेकांना अश्लील शब्दांत शिवीगाळ करतात. त्यामुळे तेथुन जाने येणे करणार्या नागरिकांना ञास होतो.सदर परिसरात जेष्ठ नागरीक बसलेले असतात. त्यांनी काही म्हटले असता त्यांना धमकाविले जाते.
हा इसम गुंड प्रव्रुती च्या असुन त्याच्या दहशतीमुळे या परिसरातील जनतेला बघ्याची भुमीका घेण्याशिवाय पर्याय रहातं नाही. त्यामुळे अशा गाव गुंडावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी
निवेदनातुन करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती पालकमंत्री विजय वडेट्टिवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुधिर भाऊ मुनगंटिवार,आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाअधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक ,आणि तहसीलदार भद्रावती यांना पाठविण्यात आल्या आहे.