गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे केन्द्र व राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर सध्या कुठेही रेती घाटाचे लिलाव झाले नाही.नेमकी हिच संधी साधून ठिकठिकाणी अवैध रेती तस्करांनी अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच श्रेणीत कोरपना तालुक्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांबरोबरच रेती तस्करांनी सुद्धा या लॉकडाऊनच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचे सोने करून घेण्यात मागे दिसत नाही.तालुक्यातील विविध घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून अव्वाच्या सव्वा दराने घर पोच केली जात आहे.महसूल विभागाकडून कारवायांचे सत्र सुरू असताना ह्या रेती तस्करीवर अंकुश लागत नाही.सतत होत असलेल्या कारवायांच्या भीतीपोटी सध्या तस्करांनी आपला मोर्चा वन क्षेत्रातील नाल्याकडे वळवल्याचे पहायला मिळत आहे.जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा करून गरजवंतांना चढ्या दराने विक्री केली जात आहे.महसुल पथक गस्तीवर असताना रेती वाहतुक करणारे लहान मासे गळाला जास्त लागतात आणि थैमान घालणारे कमी ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.काही का असेना महसुल विभागाच्या सततच्या धडक कारवायांमुळे सध्या रेती तस्करांचे धाबे दणाणले हे मात्र विशेष.
महसुल पथकाच्या गळाला लहान मासे जास्त लागतात आणि मोठे कमी ? कोरपना तालुक्यात इतर अवैध धंद्यांसह रेती तस्करी सुद्धा जोरात, संबंधितांकडून कारवाईचे सत्र सुरूच
Advertisements