ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन

0
87
Advertisements

भद्रावती .. अब्बास अजानी
मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी लोकजिवनाशी समन्वय ठेवण्याच्या द्रुष्टीकोणातुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या वडाळा संरक्षित वनाच्या जागेत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीचे उदघाटन वडाळा ग्रा.पं.सरपंच निरंजना उरकांडे यांच्या हस्ते सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून उदघाटन करण्यात आले.
या उदघाटन समारंभाप्रसंगी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण, उपसंचालक ना.सी.लडखत, सहाय्यक वनसंरक्षक एम.सी.खोरे, कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के.शेंडे, श्री चव्हाण, श्री मुन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभात वडाळा,आष्टा, घोसरी, खुटवंडा, सोनेगाव, कोकेवाडा, अर्जुनी येथील सरपंच, पोलिस पाटील व ग्राम स्तरिय ईडीसीचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. या समारंभाच्या निमित्ताने क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समारंभाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.शेंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here