बल्लारपूर, विसापूर नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा, महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत – मनसेचे निवेदन

0
95
Advertisements

बल्लारपुर – बल्लारपुर तालुक्यातील बहुतेक भागात विकासाची कामे सुरू असुन या कामाच्या बांधकामांवर वापरण्यात येणारी रेती कुठून येत आहे असे कोडं तालुक्यातील जनतेला पडलं आहे त्याचे उदाहरण असे की गरीबांना घरकुल बांधकामा साठी मुठभर रेती मिळत नसुन शासकीय मोठ मोठ्या इमारती बांधकामासाठी हायवा ट्रकने अवैध रेती उपलब्ध होत आहे.

रेतीचे लिलाव झाले नाही रेती घाट बंद आहे कोराना महामारीमळे जागोजागी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे तरी पण या सर्वांचा डोळ्यात अवैध रेती तस्करा कडून धुळ झोकून रेतीची अवैध वाहतूक बल्लारपुर तालुक्यात वाळू माफिया वाळूची तस्करी करत असल्याची खात्री लायक माहिती हाती आली असून संबंधित महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपा काढत आहे का? बल्लारपुर व विसापुर नदी पात्रातून जेव्हा वाळू उपसा करून वाळू तस्कर राज्य मार्गाने हायवा ट्रकने वाहतूक करतात त्यावेळी संबंधित प्रशासन काय करत असते.आम जनतेत चर्चेला उधाण आले आहे.

Advertisements

बल्लारपुर हा राज्य मार्ग असुन या मार्गावर महसूल, पोलिस,व वनविभागाचे मोठ- मोठे कार्यालय आहे आणि मार्गावर वनविभागाचा तपासणी नाका असुन सुद्धा अवैध वाळूची वाहतूक होतेच कशी? या मार्गावर येथे पोलिस स्टेशन, तलाठी कार्यालय, वनविभागाचे कार्यालय, याच रस्त्यावर बल्लारपुर पोलिस स्टेशनची हद्द येथे वनविभागाचे कार्यालय व तलाठी कार्यालय असुन सुद्धा अवैध वाळू वाहतूक होत असल्याने वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई का केली जात नाही? काम सुरू असुन या कामावर अवैध वाळू हायवा ट्रकने डम्पिंग करण्यात आली आहे केंद्राचे काम सुरू असल्याने ठेकेदाराकडे रेतीचे जुने राॅयलटी परवाने असल्याने संबंधित ठेकेदारची मुजोरी वाढली आहे माझे कोणीच काही करत नाही माझे संबंधित विभागाच्या अधिकार्या सोबत घनिष्ठ संबंध असल्याचे मिरवतो आणि बल्लारपुर तालुक्यातील वाळू तस्करी करणाऱ्यांची चर्चा ऐकायला मिळते की आम्ही वाळू फुकट आणत नाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खुश करतो अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे या चर्चेमुळे संबंधित विभाग अवैध रेती तस्करांवर मेहरबान दिसत असून या अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर आळा बसणार का संबंधित आरोग्य केंद्राच्या बांधकामांवर अवैध रेती डम्पिंग केली आहे. त्याच्यावर संबंधित महसूल प्रशासन काय कारवाई करणार याकडे बल्लारपुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे अशे निवेंदन देता वेळी मनसे जिल्हा सचिव (बल्लारपुर विधानसभा क्षेत्र मा.किशारेभाऊ मडगुलवार महीला तालुखा अध्यक्ष कल्पना ताई पोतर्लेवार शहर अध्यक्ष विकास दुर्ग विजय देशपांडे क्रिष्णा पोतर्लवार उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here