प्रकल्पग्रस्तांच्या विरुगिरी आंदोलनात आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ठाकरे यांची मध्यस्ती

0
84
Advertisements

चंद्रपूर – प्रकल्पग्रस्तांच्या विरुगिरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार जोरगेवार यांनी पुन्हा औष्णिक विद्युत केंद्रात जात आंदोलक यांचेशी चर्चा केली.

आंदोलकांच्या मागण्या लवकर पूर्ण होणार आहे, कारण आमदार जोरगेवार यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री ठाकरे यांचेशी चर्चा करीत आंदोलकांच्या मागण्याबद्दल विस्तृत माहिती दिली.

Advertisements

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः उपस्थित असलेल्यासोबत फोनवर चर्चा करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती सुद्धा केली व उद्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे संबंधित अधिकारी यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधणार आहे या कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्री ठाकरे सुद्धा अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलकांच्या मागणीसंदर्भात तोडगा काढणार आहे.

सध्या आंदोलकांनी विरुगिरी आंदोलन मागे घेण्याची विनंती आमदार जोरगेवार यांनी केली आहे.

आंदोलकांचे म्हणण्यानुसार जोपर्यंत आम्हाला नियुक्तीचा आदेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आम्हाला आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमच्यासोबत बोलणे करावे जेणेकरून आम्ही त्यांना परिस्थिती समजवून सांगू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here