विरुगिरीचा दुसरा दिवस, प्रकल्पग्रस्तांच उपाशीपोटी आंदोलन, मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही आत्मदहन करू

0
94
Advertisements

चंद्रपूर – 1982 पासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी एकूण 7 प्रकल्पग्रस्त चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी करीत आहे आज त्यांच्या आंदोलनाचा 2 रा दिवस आहे.

प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, प्रशासन फक्त ड्रोन ने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच काम करीत आहे.

Advertisements

आंदोलकांनी मुख्य अभियंता घुगे व ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते सरळ चुकीचा नंबर असल्याची बतावणी करून कॉल डिस्कनेक्ट करीत आहे.

आंदोलकांनी सांगितले की काल पासून आमदार जोरगेवार, राजू झोडे, डॉ अभिलाषा गावतुरे यांनीच आमच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलना नक्कीच यश मिळेल असा धीर दिला, परंतु जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार यांनी तर आमच्या आंदोलनाची साधी दखल सुद्धा घेतली नाही, आजपर्यंत नेत्यांनी आम्हाला आश्वासनांचा लॉलीपॉप दिला परंतु हे आंदोलन आरपार म्हणून आम्ही लढत आहो.

पोटात अन्न नसल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रकृती ढासळली आहे, इतकेच नव्हे तर महाजेनको तर्फे चिमणीवरची सप्लाय पण बंद करण्यात आली आहे.

आमची फक्त एकच मागणी आहे जिल्ह्यातील 650 प्रकल्पग्रस्तांना औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ 3 म्हणून कायमस्वरूपी नेमणूक करावी, अन्यथा आम्ही एकत्र चिमनिवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here