न्यायप्रविष्ट जागेवरील अनधिकृत बांधकामाला जिल्हा न्यायालयाचा ब्रेक

0
61
Advertisements

कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रतिष्ठित व्यापारी रामअवतार नावधंर हे अतिक्रमण करुन पक्के बांधकाम करीत असल्याची तक्रार मे २०१८ मध्ये ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी तहसिलदार कोरपना व ग्रामपंचायतीकडे केली होती व आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता या प्रकरणात तहसिलदारांनी कुठलीही कारवाई न करता प्रकरण तसेच ठेवले २३ मार्च २०२० ला देशात लाॅकडाऊन करण्यात आले लाॅकडाऊनच्या काळ असल्याने प्रशासन लक्ष देणार नाही असे गृहीत धरुन नावधंर यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणात वाणिज्य वापराचे बांधकाम सुरु केले याबाबत परत तहसिलदार व ग्रामपंचायती कडे मे २०२० मध्ये तक्रार केली असतांनाही प्रशासनाने अनधिकृत बांधकाम बंद पाडून कारवाई केली नाही अनधिकृत बांधमाकास ग्रामपंचायतीच्या एका पदाधिकार्‍याची साथ असल्याने पंचायतीकडून योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी चंद्रपूर दिवाणी न्यायालयात अनधिकृत बांधकाम पाडून टाकून कारवाई करण्याकरीत‍ा दावा दाखल केला असून दिनांक २७ जुलै २०२० मा.विद्यमान कोर्टाव्दारे पुढील आदेशा पर्यंत बांधकाम जसे आहे तसेच ठेवावे असा आदेश केलेला असून जिल्हाधिकारी , नगररचनाकार , तहसिलदार , सरपंच , ग्रामविकास अधिकारी नांदा , ग्रामपंचायत नांदा व रामअवतार नावंधर यांना तसा आदेश पाठविलेला आहे अनधिकृत बांधकामा विषयी सदस्याकडून तक्रार केल्यावरही प्रशासना कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन कारवाई केली जात नसल्याने अखेर तक्रारकर्त्यांला शेवटी न्यायालयात दाद मागावी लागते ही बाब गंभीर आहे जिल्हाधिकारी यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करणांर्‍या तहसिलदारावर कारवाई करणे गरजेचे आहे मताच्या राजकारणासाठी ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी अनधिकृत बांधकाम करणार्‍यांची पाठराखण करतात नावधंर यांच्या अनधिकृत बांधकामास आतामात्र कोर्टाकडूनच ब्रेक लागल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here