त्यांची ती मॉर्निंग वॉक शेवटची ठरली, चारचाकी वाहनांच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

0
72
Advertisements

वरोरा – प्रदूषण व वाढती कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्याकरिता नागरिक शुद्ध हवा व निरोगी आरोग्यासाठी सकाळच्या सुमारास फिरायला जातात परंतु हे फिरन कधी जीवघेण ठरेल सांगता येत नाही.

अशीच एक घटना वरोरा येथील मजरा गावाजवळ घडली, सकाळी 6 वाजताच्या सुमारास एक दाम्पत्य फिरायला गेले असता टाटा सफारी वाहनाने त्याला धडक देत उडविले या धडकेत त्या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

Advertisements

मजरा निवासी 58 वर्षीय हिरेंद्र सिंह व 53 वर्षीय मिरादेवी सिंह बुधवारी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक ला गेले असता उत्तरप्रदेश कडून येणाऱ्या व बंगलोर ला जाणाऱ्या अमेठी निवासी चंद्रप्रकाश तिवारी हे आपले वाहनं क्रमांक यूपी 16 बीपी 4016 ने मजरा गावाजवळ सिंह दाम्पत्याला जोरदार धडक दिली.

धडक लागताच त्या आवारात उभे असलेले रिठे नामक व्यक्तीने तात्काळ एम्बुलेन्स ला पाचारण केले असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉ यांनी त्या दाम्पत्याला मृत घोषित केले.

आरोपी वाहनचालक तिवारी यांना वरोरा पोलिसांनी अटक केले, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here