लढाई आरपारची, प्रकल्पग्रस्तांची विरुगिरी, तर आमच्या मृत्यूचे जबाबदार महाजेनको, पोलीस प्रशासन, 8 प्रकल्पग्रस्त चढले औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीवर

0
263
Advertisements

चंद्रपूर – वर्ष 1982 पासून रखडलेला प्रश्न म्हणजेच चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांचा आजही त्यांच्या जमिनीचं अधिग्रहण करून सुद्धा नौकरी मिळाली नाही, यासाठी त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या पायरीवर जाऊन दार ठोठावले असताना सुद्धा त्या प्रकल्पग्रस्ताना केवळ पोकळ आश्वासने मिळाली नौकरी मात्र नाही.

कांग्रेस असो की भाजप त्या सरकारमधील मंत्री आजपर्यंत फक्त आश्वासने देत आहे, या लढ्याला शेवट देत आज 5 ऑगस्टला देशात जय श्री रामाचा उदघोष सुरू असताना 8 प्रकल्पग्रस्त औष्णिक विद्युत केंद्रातील भल्या मोठ्या चिमनिवर चढले.

Advertisements

जमीन आमची तर आम्हाला नौकरी का नाही? असा प्रश्न विरुगिरी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी विचारला आहे.

जर आम्हाला खाली उतरविण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सर्व या चिमणीवरून खाली उडी मारू व आमच्या मृत्यूचे जबाबदार पोलीस प्रशासन, सीआयएसएफ व महाजेनको राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here