सहा महिन्यांपासून कोविड योद्धे वेतनापासून वंचित, वेतनाची चिंता व कंत्राटी कामगार महिलेचा मृत्यू

0
73
Advertisements

चंद्रपूर –  दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात ड्युटीवर असताना संगीता पाटील जागेवर कोसळली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.परंतु संपूर्ण रात्रभर एमडी,एमएस किंवा स्पेशालिस्ट यांनी येऊन तपासणी केली नाही.शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर इतर रुग्णांचे काय ? असा सवाल सुद्धा कामगारांनी केलेला आहे. या दवाखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्पेशलिस्ट डॉक्टर ला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय ? असा प्रश्न जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.या ठिकाणी रात्री स्पेशलिस्ट डॉक्टरांना कॉल केला का ? केला असेल तर डॉक्टर का आले नाही ? रूग्णावर तातडीने कोणते उपचार केले याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी केली.

मागील सहा महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही, कोरोनाचे संकट असल्याने कंत्राटी कामगारांनी सुद्धा या परिस्थितीत आपले काम नियमित सुरू ठेवले आहे, परंतु परिवार चालविण्यासाठी पैश्याची गरज असतेच, हा त्रास अजून किती दिवस सहन करायचा असा प्रश्न कंत्राटी कामगारांच्या मनात उपस्थित झाला आहे, मनात रोज एकच प्रश्न वेतन मिळणार तरी कधी?

हीच खंत कंत्राटी कामगार संगीता पाटील यांना सतावीत होती, अखेर त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी त्यांचा मृत्यू झाला, संगीताच्या पतीचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते, ति आपल्या बाळासोबत राहत होती, आता तिने सुद्धा या जगाचा निरोप घेतला त्या बाळाचे काय? जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी त्या मुलाला 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे, तोपर्यंत संपूर्ण कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू राहणार. तसेच संगीताच्या मृत्यूला जबाबदार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय संचालक, सचिव यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

चंद्रपूर जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. परंतु वेळेवर स्पेशालिस्ट हजर होत नाहीत. स्पेशालिस्ट डॉक्टर रात्रीच्यावेळी नियमित गैरहजर राहतात.काही स्पेशलिस्ट डॉक्टर 1 महिन्याच्या सह्या मारतात व आपल्या खासगी दवाखान्यांमध्ये बाहेरगावी प्रॅक्टीस करतात असा सुद्धा आरोप काही दिवसांपूर्वी झालेला होता. अनुपस्थित डॉक्टरांनी सह्या मारण्याच्या बदल्यात तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांना मलाई मिळत असल्याचे सुध्दा आरोप झाले होते. त्यामुळे या मेडिकल कॉलेज चा जनतेच्या अपेक्षेप्रमाणे उपयोग होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here