चंद्रपूर – एक वर्षांपूर्वी मंजूर झालेला रस्त्याचं बांधकाम सुरू झाले नसल्याने याबाबत तुकुम प्रभाग 1 मधील नगरसेवकाला विचारणा केली असता भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी अश्लील शिवीगाळ करीत मारण्यासाठी त्या नागरिकांच्या अंगावर धावून गेले.
तुकुम प्रभागातील 68 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बाबुराव झाडे यांच्या घरासमोरील सिमेंट रोड 1 वर्षाआधी मंजूर झाला असल्याने त्याचे काम सुरू झाले नाही, मात्र त्यानंतर च्या मंजूर झालेल्या रस्त्याचे काम सुद्धा सुरू झाले.
आमच्या घराजवळील रस्त्याचे काम सुरू करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी विचारणा भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना केली असता त्यांनी मला अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मला मारण्यासाठी माझ्या अंगावर धावून आले, असा आरोप झाडे यांनी केला आहे.
वाद इतका वाढला की नागरिकांना दोघांत मध्यस्ती करावी लागली.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार झाडे यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला दिली.
भाजप नगरसेवकाचा राग अनावर, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला केली अश्लील शिवीगाळ, दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
Advertisements