कारगाव(खु)गावाला विकासाची प्रतिक्षा, ग्रामपंचायत मधील गैरव्यवहाराची चौकशी करा, जनसत्याग्रह संघटना शाखा कारगावची मागणी

0
29
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या कारगाव(खु)मरकागोंदी हे गाव असून गेल्या 5 वर्षांपासून 14 वित्तीय आयोग व पेसा अंतर्गत मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाली.मात्र तो निधी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी गैरव्यवहार,अफरातफर करून या दोन्ही गावात विकास कामे केली नसल्याचे आरोप होत असून पेसा अंतर्गत कारगाव (खु)व मरकागोंदी येथे ग्राम पेसा कोष समितीचे स्वतंत्र खाते उघडले नाही. धनकदेवी समितीत निधी जमा करून ग्रामकोष निधीवर डल्ला मारल्याची चर्चा आहे.पुर्नवसन योजनेच्या 25 वर्षापूर्वीच्या नाल्या,रस्ते नादुरुस्त झाल्या.पावसाचे पाणी घरात घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे.ग्रामपंचायतीने पंचवार्षिक आराखडा तयार करून कामाचे नियोजन केले मात्र पेसा नियमाची पायमल्ली करून नियोजनानुसार एकही काम गावात झालेले नाही.शौचालय,घरकुल अर्धवट पडल्याने अनेक आदिवासी कुंटूबांचे अतोनात हाल होत आहे.गावात वन्यप्राण्यांची भिती असून विद्युत व्यवस्था सुद्धा बरोबर नाही,पिण्याचे पाणी,नळ योजना बंद आहे.कारगाव येथै योगा,व्यायाम साहित्य अक्षरशः उघड्यावर पडल्याचे पहायला मिळत असून ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यात यावी,ग्रामकोष स्वतंत्र खाते उघडण्यात यावे यासाठी जनसत्याग्रह संघटना कारगाव शाखेंनी एल्गार पुकारले असून संवर्ग विकास अधिकारी जिवती यांना तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here