नगरपरिषदेने त्या संस्थेला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यावर कारवाई करावी, भीम आर्मीच्या बोरकर यांचे न.प.CO आणि नगराध्यक्षांना निवेदन

0
93
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर नगरपरिषदकडून शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित” या संस्थेला कंत्राट दिले मात्र शहरात कित्येक ठिकाणी कचरा पसरल्याने घाणीचे साम्राज्य पहायला मिळत आहे.यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित करत नगरपरिषद सोबतच सदर संस्थे विषयी शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळत असून याला जबाबदार म्हणून नगरपरिषदेच्या शासकीय अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करून त्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अन्यथा भीम आर्मीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे उपजिल्हा प्रमुख मदन बोरकर यांनी नगरपरिषदेच्या co आणि नगराध्यक्षाला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात बोरकर यांनी म्हटले आहे की,गडचांदूर नगरपालिका क्षेत्रातील खाजगी घरे,सार्वजनिक जागा,शासकीय कार्यालय,शौचालय या सर्व मालमत्तेवर देखरेखीसाठी नगरपरिषदेने सदर संस्थेला लाखोंच्या दराने तीन वर्षासाठी कंत्राट दिले.मात्र त्याला कंत्राटदाराने सर्सपणे केराची टोपली दाखवत करारा विरुद्ध कामे सुरू केली.करारानुसार एकत्रित न करता ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करायचे होते अन्यथा दंडाची तरतूद करण्यात आली होती मात्र असे झाले नसून मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही.याचप्रमाणे ठरलेल्या दरानुसार कामगारांच्या वेतनात शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करणे बंधनकारक होते परंतु सदर कंत्राटदार 220 प्रमाणे सर्व मजुरांना 7500 प्रती माह वेतन देत आहे.यावरही मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही.घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 व राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांनी वेळोवेळी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असताना सदर कंत्राटदाराने घनकचरा विलगीकरणात व कंपोस्टींग न करता एकत्रित टाकल्याने तेथील परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.याच कंत्राटदाराचे बल्लारशाह नगरपालिकेत सुद्धा सफाई काम सुरू आहे.त्या पालिकेला 3 स्टार नामांकन मिळाले मात्र याठिकाणी नवखा सब कॉन्ट्रक्टर असल्याने त्याला शहराच्या स्वच्छते विषयी काडीमात्र माहिती नाही परिणामी स्थानिक नगरपरिषदेला एकही नामांकन मिळाले नाही.याविषयी सुद्धा मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नसून उलट काम चांगले असल्याचे निर्देश देऊन यावर्षीही याच कंत्राटदाराला काम देण्यात आले.गडचांदूर नगरपरिषदेत मोठ्याप्रमाणात घोळ सुरू असल्याचे मजकुर बोरकर यांनी निवेदनात नमूद केले असून यासर्व बाबींना जबाबदार असलेल्या नगरपरिषदेच्या शासकिय अधिकार्‍या‍ंवर तत्काळ कारवाई करून चंद्रपूर येथील त्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली असून अन्यथा भीम आर्मीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा सुद्धा बोरकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here