रोटरी क्लब भद्रावतीचा 6वा पदग्रहण सोहळा उत्साहात सम्पन्न

0
57
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानी

सन 2020-21 या वर्षाकरीता भद्रावती रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी डिस्ट्रिक्ट गवर्नर शब्बीर शाकिर आणि सहाय्यक गवर्नर सचिन गांगरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात डिस्ट्रिक्ट ऑफिसर विरुभाऊ हजारे आणि अरुण तिखे यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व सामाजिक अंतर व कोविड-19 चे नियम पाळून सदर पदग्रहणसोहळा संपन्न झाला.

Advertisements

या नवीन वर्षाच्या रोटरी क्लब अध्यक्षपदी विनोद कामडी यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष सुनील पोटदुखे यांच्याकडून पदभार स्विकारला.तर सचिवपदी प्रवीण महाजन यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते सचिव किशोर खंडाळकर यांच्याकडून पदभार स्विकारला.तसेच नवीन संचालक मंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून सचिन सरपटवार, सहसचिव अब्बास अजानी, कोषाध्यक्ष सुधीर पारोधी, सार्जेन्ट अॅट आर्म्स डॉ. माला प्रेमचंद, पब्लिक इमेज चेअरमन म्हणून भाविक तेलंग यांची घोषणा करण्यात आली.

यावेळी रोटरी क्लबचे सदस्य डाॅ.प्रवीण केसवानी यांची कन्या खुशी हिने सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमात दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.तसेच रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य भाविक तेलंग आणि नवोदित सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विरुभाऊ हजारे, अरुण तिखे व सुनील पोटदुखे यांनी मार्गदर्शन केले.नवीन सदस्य म्हणून विक्रांत बिसेन,प्रशांत तेलंग,रुपेश ढवस,संजय बोरकुटे यांनी रोटरी क्लबमध्ये प्रवेश घेतला.या कार्यक्रमांचे औचित्य साधुन सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, युवराज धानोरकर, अविनाश सिद्धमसेट्टीवार, विवेक आकोजवार, तुषार सातपुते, चम्पतराव आस्वले, प्रकाश पिंपळकर, आनंद क्षीरसागर, वसंता उमरे, विनोद घोड़े, मदन ताठे, किशोर बावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.प्रवीण केसवानी व सचिन सरपटवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here