Advertisements
वरोरा : अलीकडेच १० च्या निकाल जाहीर झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भरघोष गुण पटकाविले आहे. त्यांच्या या गुणांचे कौतुक करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धा नोरकर यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले.
वरोरा येथील १० मधील कु. मृणाल उमेश लाभे 98.60%, कु.गायत्री राजेंद्र मेने 98%, कु.सहयाद्री संभाजी मिलमिले 96.60 %, कु.आर्या चंद्रशेखर रहाटे 95.40%, कु.अवंतिका जीतेंद्र मत्ते 95.40%, कु.यशश्री लोणबले 93.60%, कु.आस्था ढाले 93.60%, कुमार शंतनु बाबाराव गमे 92.53% ह्यांच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष,वरोरा शहर काँग्रेस कमिटी विलास टिपले, सभापती कृ.उ.बा.स राजेंद्र चिकटे, सुभाष दांदडे, गणेश मुसळे यांची उपथिती होती.
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रमाणे या गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रम घेता आला नाही. त्याच दुःख असल्याचं मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यां नी यावेळी बोलून दाखवली. भविष्यात या भागच नाव नाहीतर देशाच नाव मोठं करण्याची जबाबदारी या गुणवंतांवर असून ते असाच प्रकारचं यश पुढे देखील संपादन करतील अशी अशा त्यांनी व्यक्त केली.