विकासाच्या दृष्टिकोनातून सीमा लगतच्या भागांचाही मनपा क्षेत्रात समावेश करा – आ. किशोर जोरगेवार

0
71
Advertisements
चंद्रपूर – सर्वसमावेशक विकासासाठी चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीचा विस्तार करून यात महानगरपालिकेच्या सीमा लगतच्या दुर्लक्षित भागांना समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे पत्र त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांना दिले आहे.
 2011 साली चंद्रपूर नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकामध्ये करण्यात आले. मात्र त्यावेळेस या क्षेत्रामध्ये फक्त चंद्रपूर शहरालास समाविष्ठ करण्यात आले.  चंद्रपूर शहरालगत ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाळी, दाताळा, म्हाडा कॉलनी, एमआयडिसी व आरवट हा भाग औद्योगिकदृष्ट्या संपन्न असून यातील बहुतांश कामगार व कर्मचारी हे चंद्रपूर शहर  महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे.
       परंतु सदर भाग चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ठ नसल्यामुळे महानगरपालिकेवर आर्थिक ताण येत आहे. तसेच वरील भाग हा महानगरपालिकेशी संबधित आहे. परंतु ग्रामीण भागात समाविष्ठ असल्यामुळे या भागाची प्रगती थंड बस्त्यात आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाठी  ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाली, चिंचाळा, एमआयडिसी, दाताळा, देवाडा, आरवट या ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ईतर ग्रामपंचायती चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here