आमच्यात विकासाची धडपड मात्र सत्ताधार्‍यांच्या मनमानीने शहर विकासाचा अडला घोडा, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सुहेल अलींचा आरोप

0
138
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्य सिमा लगत मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील जनतेला मुलभुत सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अॅड.संजय धोटे यांच्या निधीतून राजूरा विधानसभेतील राजूरा,कोरपना,गोंडपिपरी व जिवती शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे करून गावांचा चेहरा-मोहरा बदलला मात्र यात कोरपना नगरपंचायत अपवाद ठरली.वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांसाठी सन 2017-18 वित्तीय वर्षात 2 कोटी व नवीन नगरपंचायत विकास कामांसाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून दिली परंतु न.प.च्या उदासीनतेमुळे 2 कोटी निधी खर्च झाली नाही.या निधीतून अंदाज पत्रक तांत्रीक प्रशासकीय 1कोटी 93 लक्षाचे 13 कामे मंजूर आहे.असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांना शासनाने दिलेल्या आदेशामुळे कत्रांटदार न्यायालयात आदेशाला आवाहन दिल्याने विकास काम रखडले सर्व कामे एकाच व्यक्तीला देण्यात आले आहे हे मात्र विषेश.
लोकप्रतिनिधी या नात्याने गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कोरपना नगरपंचायत क्षेत्रात माजी मंत्री व आमदारांच्या प्रयत्नातून पंचायत समिती प्रशासकीय इमारत अद्यावत करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष,नवीन नगरपंचायत,नाली,रस्ते बांधकामांसाठी 1 कोटी csr निधीतून 5 ठिकाणी बोअरवेल,बस स्टॉपवर सार्वजनिक शौचालय खनिज विकास निधीतून बाजार ओटे,शेड,नागरिकांना पिण्यासाठी पाणी(R O), चांदा ते बांदा योजनेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संचासह अभ्यासिका,आमदार विकास निधीतून वार्ड क्रं.11 मध्ये वाचनालय इमारत,2515 निधी अंतर्गत इस्माईल शेख यांच्या घरा पुढील सरस्वती मंदिर,रमेश मालेकर वार्ड क्रं.1अनिल रेंगुंडवार यांच्या घरा समोरील सिमेंट काँक्रिट रस्ता,राम मंदिर कम्पांऊड भिंत,मामा तलाव खोलीकरण,जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट बंधारे शेतात ढाळी मातीबांध,यामूळे गावात पाणी पातळीत वाढ होऊन 2020 मध्ये दुष्काळाची तीव्रता कमी होऊन टँकर लावण्याची गरज भासली नाही.तलाठी कार्यालय इमारत प्रथमच जि.प.शाळेला संगणक संच,विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध झाल्यामुळे विकासात भर पडली.मात्र 2 कोटी आराखड्यातील विकास कामे रखडल्याने इतर वार्डात रस्ते,नाली बांधकाम,बाल उद्यानाची कामे रखडल्याने रस्ते खड्डे व चिखलमय झाल्याने गावाच्या विकासावर परिणाम दिसून येते.कोरपना तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावात यापुर्वीच्या दोन नळ योजना निष्फळ,अर्धवट व कुचकामी ठरले.नवीन धोरण,वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज भागविण्यास नगर प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे मत नगरसेवक सुहेल आबीद अली यांनी व्यक्त करून रखडलेल्या कामांची सुरुवात करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.आम्हाला शहर विकासाची धडपड आहे मात्र सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने शहरात विकास कामांचा घोडा अडल्याचा आरोप नगरसेवक सुहेल यांनी News34 ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here