अब्बास अजानी .भद्रावती
वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या दोन युकांना भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेंशन पथकाने मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून वाघाचे एक नख जप्त करून त्यांना वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.
भद्रावती शहरातील गुरूनगर वस्तीत दोन युवक वाघाचे एक नख विकण्यासाठी ग्राहक शोधत आहेत,अशी गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेंशन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी आपल्या पथकासह दि.1ऑगस्ट रोजी गुरुनगर परिसरात सापळा रचला.या सापळ्यात रात्री 10 ते 12 वाजताच्या दरम्यानच्या कालावधीत प्रशांत बालाजी बावणे (27) रा. मुधोली व विकास ऋषी बावणे (22) रा.गुरूनगर भद्रावती हे दोन युवक वाघाचे एक नख विकताना रंगेहाथ पकडल्या गेले.या नखाची किंमत 2 लाख रुपये असल्याचे समजते.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून नख जप्त करून त्यांना भद्रावती वनविभागाच्या स्वाधीन केले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,वरोरा उपविभागीय पोलिस अधीकारी निलेश पांडे,भद्रावतीचे ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेंशन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार ,पोलीस शिपाई सचिन गुरनुले, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, निकेश ढगे यांनी केले.