मंदिरात देव नाही शिक्षक आला समोर, सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत मंदिरात सुरू केली शाळा

0
141
Advertisements

वरोरा /उखर्डा:– कोरोना लॉक डाऊन मुळे शहर ,गाव ,शाळाही बंद आहे .त्यामुळे गावातील चिमुकले घरात आणि परिसरात खेळताना दिसतात .त्यांना सांगणारे ,बोलणारे कोणीही नाही या सगळ्या मुळे त्यांचे नुकसान होत आहेत .अश्यावेळी त्यांच्या कोवळ्या मनावर सकारात्मक संस्कार होतील ही जाणीव ठेवून , उखर्डा येथिल शेतकरी पुत्र अभिजित प्रभाकर कुडे या युवकाने गावातील मुलांना एकत्र करून गावातील मंदिरात च शाळा सुरू केली.
अभिजित कुडे हा वर्धा येथे शिक्षण घेत आहे सध्या तो सुद्धा गावातच आहे त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील मुलांना झाला पाहिजे असे त्याला वाटले ,अभिजित नेहमीच सामाजिक कार्यात,वेगळे वेगळे उपक्रम गावात राभवत असतो परिवर्तनाचा चळवडीत अग्रेसर असतो.
लॉक डाऊन मुळे मुलांची शाळा बंद आहे त्या मुळे ते दिवसभर खेळताना दिसतात , आपण त्यांना शिकवावे असे त्यांच्या मनात आले .यासाठी गावातील मंदिराची निवड केली .
ही शाळा सायंकाळी ४ ते ७ पर्यंत असते ,वर्ग १ ते ८ पर्यंत चे ६४ विद्यार्थी ची ३ बॅच करून त्यांना इथे शिकविले जाते ,या साठी अभिजित ला गावातील युवकांची देखील सोबत मिळाली स्वयंसेवक म्हणून ८ युवक आले , रंजीत कुडे,विनोद कोठारे,रोशन भोयर ,ऋषिकेश कुडे,तेजस ऊरकुडे, अनिकेत राऊत ,तुषार , यांनी या मध्ये साथ दिली
कुठेलेही चांगलं काम करतांना समाजातील अनेक मंडळी आपल्या पाठीशी असतेच….
माझ्या गावी सुद्धा असेच काही झाले….
या या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था तर्फे बूक,पेन ,पेन्सिल , व साहित्य देण्यात आले ,अमोल भाऊ घोटेकर अध्यक्ष न्यूः आदर्श बहुउद्देशीय संस्था , रंजीत कुडे,रोशन भोयर ,विनोद कोठारे ,विजय कुडे यानी आर्थिक मदत केली….
व महत्वाचे म्हणजेच या उपक्रमासाठी सरपंच श्रीमती मनाबाई उईकें व उपसरपंच विलास भाऊ कुडे यानी मदत केली व पुढे मदत लागली तर नक्की मदत करू असे सांगितले.
या मध्ये मुलांच्या पालकांनी परवानगी दिली व गावातील नागरिकांनी छान प्रतिसाद मिळाला .
हसत खेळत शिक्षण म्हणून वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत प्रेरणादायी गोष्टी ,गृहपाठ , शुध्द लेखन ,महापुरुषांची चरित्रे या बद्दल शिकविले जाते ,लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांना बक्षिस दिले जाते .अभिजित च्या उपक्रमाचे मुलांना अभ्यासाची गोडी व शिस्त लागली त्या मुळे पालक समाधानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here