जनप्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गरजवंतांना मास्क, सॅनिटायझेशन बॉटल व मिठाईचे वितरण, नईराह फाऊंडेशनचा विधायक उपक्रम

0
73
Advertisements

चंद्रपूर-गेल्या 3 दशकापासून जनतेच्या मनावर आपल्या लोकोपयोगी विकास कार्याचा ठसा उमटविणारे महाराष्ट्र शासनाचे माजी वित्तमंत्री व विद्यमान आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस कोरोना संक्रमण असतानाही रस्त्यावरील गोर गरीब,ऑटोधारक,कष्टकरी मजूर यांना मुखपट्टी, सॅनिटायझेसन बॉटल व मिठाई वितरण करून आनंदात साजरा करण्यात आला.
नई राह फाऊंडेशनच्या सदस्य श्रीमती संगीता चव्हाण,पूजा शेरकी,रेखा जाधव,छाया उपरे व अन्य भगिनींनी स्वखर्च उचलून कोरोना प्रतिबंधक साहित्य वितरण करून सुधीरभाऊ बद्दल आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा प्राजक्ता वासेकर तर आभार प्रदर्शन संगीता चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here