एका अपघाताने हिरावली चिमुकल्यांची मैत्रीण, मैत्री दीनानंतर घडली दुर्दैवी घटना

0
89
Advertisements

गोंडपीपरी – आष्टी कडून गोंडपीपरी कडे येणाऱ्या पीकअप वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते वाहन वाटेत असणाऱ्या पंढरी मेश्राम यांच्या घरात शिरल्याने मेश्राम यांच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांच्या अंगावरून ते वाहन गेल्याने ते तिघेही गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात 7 वर्षीय चिमुकली दगावली, ही घटना रात्री साडे 9 च्या सुमारास घडली. त्या वाहनांचा वेग भरधाव असल्याने त्याचा समोरचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला.

Advertisements

पिकअप वाहन क्रमांक एमएच 33 जी 0560 हे वाहन मेश्राम यांच्या शौचालयाच्या भिंतीला धडक देत बाजूला खेळत असणाऱ्या 7 वर्षीय अश्लेषा पंढरी मेश्राम, 10 वर्षीय अस्मित बंडू मेश्राम, 12 वर्षीय माही बंडू रामटेके यांच्या अंगावरून गेली.

अश्लेषा ला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच तिने आपले प्राण सोडले, 2 चिमुकले हे गंभीर जखमी झाले आहे, या घटनेने नवेगाव वाघाडे गावात शोककळा पसरली.

घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालकला अटक केली, सदर पिकअप वाहन चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनवरून ताबा सुटल्याची माहिती आहे, पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here