चंद्रपूर@509, आज 13 बाधितांची जिल्ह्यात भर, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव, जिल्हाधिकारी कार्यालयात 2 दिवसांसाठी अभ्यागतांच्या भेटी बंद

0
40
Advertisements

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 509 झाली आहे. यापैकी 323 बाधित बरे झाले आहेत तर 186 जण उपचार घेत आहेत.

शुक्रवारी एकूण 13 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
आज पुढे आलेल्या एकूण 13 बाधितामध्ये

3 कोरोना बाधित हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सावधानते साठी जिल्हाधिकारी खेमणार यांनी 2 दिवस अभ्यागतांच्या भेटी बंद केल्या आहे, सोबतच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण 52 कंटेंटमेंट झोन कार्यरत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here