गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस कोरपना तालुका भाजपाच्या वतीने विविध जनहिताच्या कार्यक्रमांद्वारे सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला.कोरपना तहसील कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कोरपना तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ.गायकवाड,कवडू जरीले,सरपंच अरूण मळावी,पुरुषोत्तम भोंगळे,किशोर बावणे,शशिकांत अडकिने,अनील कवरासे,दिनेश खडसे,यशवंत इंगळे, मनोज तुमराम,कोहचाटे,विनायक जिवतोडे,निवृत्ती डोहे,प्रवीण भोयर, सुधाकर कव्वलवार,दिवाकर गेडाम सह इतर भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या आधीन राहून सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.संचालन पुरुषोत्तम भोंगळे आभार शशिकांत अडकीने यांनी मानले.
विकास पुरुष नावाने प्रसिद्ध माजीमंत्री मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा, वृक्षारोपण,फळ वाटप असे जनहिताचे कार्यक्रम आयोजित
Advertisements