रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आप ने दिल्या माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
32
Advertisements

चंद्रपूर –  दीनांक 30 जुलै रोजी मा. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार माजी राज्य वित्त व वने मंत्री यांचा जन्मदिन या माध्यमातून वडगाव रोड वरील कॉन्क्रीट रोड मधील खड्डे आणि रोड मधे फट पडली आहे त्यात बेशर्माच वृक्षारोपण करून महानगर पालिका मधील सावळा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार निदर्शनास आणून देण्या करिता हा शुभेच्छा कार्यक्रम हवेली गार्डन चौकात घेण्यात आला आणि जनतेची ही माफक अपेक्षा आहे की त्यानी स्वता जातीने लक्ष द्यावे , या वेळी आप चे प्रशान्त येरने हे स्वता सिविल इंजीनियर आहे त्या मुळे त्यानी जनतेला या भ्रष्टाचार बद्दल सखोल विश्लेषण करून सांगितले की यात कश्या प्रकारे काम व्हायला पाहिजे होत . स्थानिक परिसरातील जनतेने सुद्धा या आगळ्यावेगळ्या उपक्रमात समर्थन देत सहभाग घेतला आणि या वेळी आप चे एडवोकेट राजेश विरानी (महानगर अध्यक्ष), सुनील रत्नाकर भोयर (उपाध्यक्ष),  प्रशांत एरने (महानगर संग़ठन मंत्री), सिंकदर सागोरे( कोषाध्यक्ष) , अजय डुकरे( सहसचिव) , राजेश चेडगुलवार (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) , पंकज रत्नपारखी , सूर्यकांत चांदेकर, मुकुल कामळे,इत्यादि कार्यकर्ते उपस्थिति होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here