अरेच्चा कमालच झाली…..! तो कोरोना बाधीत गुन्हेगार तर न.प.प्रशासन का नाही ? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गडचांदूर भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
92
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अमरावती वरून गडचांदूर शहरात दाखल झालेल्या त्या कोरोना बाधित जावयाच्या बेजबाबदारपणामुळे येथील प्रभाग क्रमांक 7 मधील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा ठपका ठेवून स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने 3 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.मात्र यासंदर्भात हलगर्जीपणा न करता नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असती तर आज हा प्रसंग घडला नसता ज्याप्रमाणे तो रुग्ण जितका दोषी आहे तितकेच नगरपरिषद प्रशासन सुद्धा दोषी असल्याचे म्हणत यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तक्रारकर्ता गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचवार व नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.
सदर कोरोना बाधित व्यक्ती अमरावती वरून एका खाजगी वाहनाने गडचांदूर शहरात आला होता.त्यानंतर तो स्वतःच कोरोना तपासणीसाठी स्थानिक सावित्रीबाई फुले महाविद्यालय कोविड केअर सेंटर पोहचला.परंतु आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा योग्य पत्ता व दुरध्वनी क्रमांक न घेता परस्पर सोडून दिले.आम्ही केलेल्या तक्रारी नंतर आता कुठेतरी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी उलट त्या रुग्णावरच कारवाई करण्याचे षडयंत्र रचून स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत कारवाईच्या मागणीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.असे मत नगरसेवक डोहे यांनी व्यक्त केले तर आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदनातून विनंती केली होती की,सदर घटनेवर उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी परंतु फक्त त्या कुटुंबावर कारवाई करून हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे.सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा जोकुणी दोषी असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही.आणि घटना घडत असताना जर कारवाई होत नसेल तर आम्ही भाजपच्या वतीने संवैधानिक मार्गाने आंदोलन उभारू असा इशारा देत सदर प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाच्या संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी उपलेंचवार व डोहे यांनी News34 ला दिलेल्या मुलाखतीत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.यावेळी भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे यांची सुद्धा उपस्थीती होती.याप्रकरणी वरिष्ठांना पत्र सुद्धा पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here