घुग्गुस – राज्यातील ग्रामपंचायतीवर अशासकीय प्रशासक नेमण्याचे राज्य सरकारचे आदेश निघाल्यावर प्रशासक पदी इच्छुकांची गर्दी जमू लागली परंतु जे या पदासाठी खरंच पात्र आहे त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
घुग्गुस ग्रामपंचायतीवर शामराव बोबडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी शासनाकडे केली आहे.
शामराव बोबडे हे जेष्ठ पत्रकार असून मागील अनेक वर्षांपासून घुग्गुस नगरपरिषद व्हावी यासाठी एकाकी लढा देत आहे, त्यांची नियुक्ती ग्रामपंचायत प्रशासक पदावर झाल्यास त्या पदाला बोबडे हे नक्कीच न्याय देतील असा विश्वास घुग्गुस शहरातील नागरिकांना आहे.
युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी नगरविकास मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
युवासेनेच्या वतीने शहरप्रमुख बंटी घोरपडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश शेंडे, अजय जोगी, प्रभाकर चिकनकर, महेश शेंडे व चेतन बोबडे यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.
घुग्गुस ग्रामपंचायतीवर प्रशासक पदी शामराव बोबडे यांची निवड करा, युवासेनेची नगरविकास विभागाला मागणी
Advertisements