माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून साजरा, गडचांदूर शहर भाजपतर्फे कंटेंन्टमेंट झोन मधील गरजूंना धान्य कीट वाटप

0
71
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे माजी अर्थ,नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस 30 जुलै रोजी सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला.शहरात सध्या कडक संचारबंदी लागू असून येथील प्रभाग क्रमांक 7 हा गेल्या 11 दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र (कंटेंन्टमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे.सदर क्षेत्रात बरेचशे रहिवासी हे रोजमजूरी करणारे असून मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक नगरपरिषदेच्या परवानगीने भाजपाचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते येथील गरजूंना धान्य कीटचे वाटप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here