अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा – यंग चांदा ब्रिगेडची मागणी, जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
127
Advertisements

चंद्रपूर – कोरोना परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून सर्व अधिकृत अध्ययन केंद्रे बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या तीन महिन्याच्या कालावधीत संगणक प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या संस्था चालकांचे हि आर्थिक नुकसान झाले आहे, हि बाब लक्षात घेता अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना देण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे. याचाच भाग म्हणून अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्र हि शासनाच्या वतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता प्रशासनाच्या वतीने हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी होत आहे. मागील काही महिन्यापासून हे केंद्र बंद असल्याने शासकीय स्तरावर विविध पदांच्या भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज कारण्यार्यांना अडचण होत आहे तसेच इच्छुक उमेदवारांना एम.एस.सी.आय.टी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविणेही कठीण झाले आहे. तसेच सततच्या बंदमुळे केंद्र चालकही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व परिस्थीतीचा विचार करून सर्व अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावेत अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी संदर्भात यंग चांदा ब्रिगेडचे संघटक अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात अधिकृत अध्ययन संगणक प्रशिक्षण केंद्र चालकांच्या एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेतली असून त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे. यंग चांदा ब्रिगेडचे राशीद हुसैन, गौरव जोरगेवार, नकुल वासमवार आदींची तर केंद्र चालकांपैकी रमजान खान, नासीर खान, लक्ष्मीकांत कामळे, गणेश धानोरकर, युवराज पवार उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here