गणेश लोंढे / नांदा फाटा
कोरपना तालुक्यात नांदा पालगाव गडचांदूर या ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला असून अनेक कंटेन्मेन्ट झोन बनविण्यात आले आहेत नांदा येथे सांस्कृतिक भवनाजवळ परराज्यातून पाळीला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कुंदन मेडिकल ते नावंधर यांच्या घरापर्यंत कंटेंट झोन घोषीत करून बॅरिकेटिंग केले आहे शासनाच्या नियमानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना १४ दिवस विनाकारण बाहेर पडता येत नाही तसेच या क्षेत्रामध्ये कोणी नागरिक प्रवेश सुद्धा करू शकत नाही कोविड प्रतिबंधित झोनमधील काही नागरिक नियम पाळत अाहे मात्र नांदा ग्रामपंचायतीचे उपसरपंचांकडून प्रतिबंधित क्षेत्रातील महिलांना शेतात कामावर नेल्याची बाब समोर आली असून दिनांक २७/०७/२०२० रोजी याच ठिकाणाचा आॅटोव्दारे परिवारातील काही सदस्यांना चंद्रपूर येथे दवाखान्यातही नेले असल्याची माहीती आहे ग्रामपंचायतीचे जबाबदार पदाधिकारीच कायदे नियम धाब्यावर ठेवून प्रतिबंधित क्षेत्राचे उल्लंघन करीत असल्याने अशा बेजबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रतिक्रिया :-
मी ग्रामपंचायतच्या उपसरपंच या जबाबदार पदावर असून कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करीत आहे मात्र काही माझे विरोधक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून या बाबतीत काही तत्य नाही मी कुणालाही कंटेंटमेंट झोन मधून कुठेही नेले नाही.
पुरुषोत्तम आस्वले
उपसरपंच ग्रा.प.नांदा