गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची जनसत्याग्रह संघटनेने एका शिष्टमंडळासह भेट घेऊन अल्पसंख्याक घरकुल व मॉ फातिमा योजना तयार करावी या मागणीचे निवेदन दिले असून यासाठी मंत्री महोदयांची भूमिका सकारात्मक दिसल्याची प्रतिक्रिया संबंधितांकडून देण्यात आली आहे.रमाई,शबरी,अहिल्याबाई होळकर,यंशवंतराव चव्हाण आवास, वसाहत योजनेच्या धर्तीवर मुस्लिम समाजासाठी स्वंतत्र आवास योजना तयार करून मॉ फातिमा ह्या मुस्लीम समाजातील आदर्श व पहिली महिला शिक्षीका असल्याने यांच्या नावाने योजना तयार करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.अनेक अटी,निकष व शर्तींमुळे सदर समाज लाभापासून दुर्लक्षित होत आहे.ग्रामीण व शहरी भागात कित्येक मुस्लिम समाजाची घरे व अवस्था अत्यंत दयनीय असून सदर समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याची अत्यंत गरज आहे. यांच्या उत्थानासाठी योजना तयार करावी करीता निवेदन देऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.यावर मंत्री वडेट्टीवार यांनी “माझ्याकडे मागास कल्याण खातं आहे.मुस्लिम OBC घटकांसाठी मागास कुंटूबांना घरे व इतर सर्व घटकांना लाभ मिळावा यासाठी अल्पसंख्यांक कल्याणमंत्री व गृहनिर्माणमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री यानात्याने मी स्वतः शासन स्तरावर पाठपुरावा तसेच मंत्रीमंडळापुढे याविषयी चर्चा करून मॉ फातिमा आवास व वसाहत योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक व सहकार्याच्या भावनेतून प्रयत्नशील राहणार” असे आश्वासन मंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले आहे. जनसत्याग्रह संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैय्यद आबीद अली यांच्या नेतृत्वात करीम भाई,छोटू भाई,सुलतान शेख,अख्तर सिद्दीकी,रमीज़ शेख सह इतरांची यावेळी उपस्थित राहून निवेदन दिले असून मागणी मान्य झाल्यास यामुळे मुस्लिम समाज बांधवांना हक्काचा निवारा व वसाहत उपलब्ध होणार हे मात्र विशेष.
अल्पसख्यांक घरकुल व मॉ फातिमा योजनेच्या मागणीचे निवेदन सादर, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भूमिका सकारात्मक, शिष्टमंडळाला आश्वासन
Advertisements