चंद्रपूर – कुपोषित बालकांचे दत्तक पालकत्व आशय या उपक्रमाचे उद्घाटन 29 जुलै 2020 रोजी जागतिक ओ आर एस दिनी इंडियन अकॅडमी ऑफ इंडिया आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त प्रयत्नाने आशय या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये चंद्रपूर ग्रामीण भागातील 54 मुलं मध्यम कुपोषणाच्या श्रेणीत आहेत त्यांना चंद्रपुरातील 30 बाल रोग तज्ञ यांनी दत्तक घेण्याचे ठरवले आहे ही 54 मुलं जी माध्यम कुपोषणाच्या श्रेणीत आहेत जर त्यांची आत्ताच काळजी घेतली नाही तर तीव्र कुपोषण श्रेणीत जाऊ शकतात कुपोषित मुलं अनेक संसर्ग रोगाला बळी पडतात त्यामुळे त्यांची भूक मंदावते व परत ते कुपोषित होतात कुपोषण आजार कुपोषण हे कोण आहेत या या दुष्टचक्रातून बाहेर पडत नाही व कधी कधी त्यांचा मृत्यू संभवतो हा बालमृत्यू दर कमी व्हायला पाहिजे तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी’ कुपोषण मुक्त चंद्रपूर’ या ध्येयाने पेटलेली चंद्रपूर बालरोग तज्ञांची संघटना आशय हा उपक्रम घेऊन पुढे आले यामध्ये बाल रोग तज्ञ कुपोषित मुलांच्या गावी जाऊन त्यांना भेट देणार आहेत तसेच जेव्हा जेव्हा या मुलांना वैद्यकीय उपचारांची गरज भासेल ही डॉक्टर मंडळी तत्परतेने त्यांना मदत करतील. ही मुलं कुपोषणाच्या कक्षेबाहेर येईपर्यंत त्यांची काळजी घेतील या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री संजय कोल्हे सर यांनी केले आपल्या भाषणात ते म्हणाले बालकांचे व पालकांचे समुपदेशन किती महत्त्वाचे आहे तसेच बाल रोग तज्ञ ची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. प्रस्तावना संघटनेच्या सचिव डॉ अभिलाषा गावतुरे यांनी केली.तसेच त्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय भांदक्कर सर यांनी दिली आय ए पी संघटनेचे अध्यक्षा डॉक्टर अपर्णा आंदनकर यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानून त्यांना पुष्पगुच्छ दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज गहलोत यांनी या उपक्रमाची स्तुती केली प्रशासन नेहमीच बालक तज्ञांच्या सोबत मिळून कुपोषण निर्मूलन साठी सतत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे काम या क्षेत्रात अहवाल आहे यांनी अभिमानाने सांगितलं आय एम ए अध्यक्ष डॉक्टर माडुरवार सर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. डॉ सोनाली कपूर यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे संचालन डॉ मुत्यतलवार यांनी केले या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ञ तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.
राज्यातील पहिलाच उपक्रम, चंद्रपूरच्या बालरोगतज्ज्ञांनी घेतले तालुक्यातील 54 कुपोषित बालकांना दत्तक
Advertisements