गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपूर हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा राज्याला जोडला जातो.मोठ्याप्रमाणावर या मार्गावरून वाहतूक सुरू असते.काही वर्षापूर्वीच या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र आता कित्येक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून धुळीमुळे रस्त्या लगतच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.वाट शोधण्यासाठी बाईक स्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामांसाठी तालुकावासी दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात.आसन गावापासून पुढे सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील डांबर अदृश्य झाले आणि धारदार गीट्टी पसरली आहे.याचा नाहक त्रास विविध वाहनचालकांना होत अल्याने कित्येकदा रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांना उधाण आले आहे.दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडत असल्याने निष्पाप नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.संबंधीत विभागाने आतातरी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या जीवघेणा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य.अपघाताची श्रृंखला सुरू, धुळीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल
Advertisements